मुंबई : नव्या वर्षी बक्कळ कमाई करायचा विचार असेल तर अमूल तुमच्यासाठी नवी संधी घेऊन आलं आहे. नवीन वर्षामध्ये अमूल फ्रॅन्चायजी ऑफर करत आहे. अमूल कोणतीही रॉयल्टी आणि प्रॉफिट शेयरिंगशिवाय ही फ्रॅन्चायजी देणार आहे. एवढच नाही तर अमूलची फ्रॅन्चायजी घ्यायचा खर्चही जास्त नाही. २ लाख रुपये ते ६ लाख रुपये गुंतवून तुम्ही व्यवहार सुरु करु शकता.
अमूलने दोन प्रकारच्या फ्रॅन्चायजी ऑफर केल्या आहेत. जर तुम्हाला अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल क्योस्क फ्रॅन्चायजी घ्यायची असेल तर २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.