पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला आहे. तर महारष्ट्रातील विदर्भासह काही भागात पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, पॉंडेचरी या राज्यांना विजांच्या कडकडाटांसह तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात हवेची गुणवत्ता ही अतिशय खराब राहणार आहे. तर दक्षिण आणि पश्चिम भारतात हवेची गुणवत्ता ही खराब राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण अंदमान सागरात चक्रीवादळांच्या निर्मितीने बंगालचा उपसागर आणि अंदमान सागराच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम ४ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला देशातील काही भागात दिसून येणार आहे. त्यामुळे पुढच्या पाच दिवसात देशातील काही भागांना तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसात तापमान २ ते ३ अंशाने वाढणार असून, मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार नाही. पुढच्या दोन ते तीन दिवस सकाळच्या वेळेत पूर्व उत्तरप्रदेश आणि पूर्वेकडील काही राज्यात मध्यम पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here