पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलं ते घ्यायचं नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त वादच सुरू आहेत. मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी वाद उकरून काढले जात आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मला कधी कधी वाटतं की राज्यपालांना असं बोलण्यासाठी कोणी सांगत की काय? नवीन वाद उकरून काढून लक्ष वळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे का? असा प्रश्न पडतो. कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नये.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त वाद करत बसायचे आहे. इतिहासाला डाग न लागता चित्रपट बनवले पाहिजेत, असे ते म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणले की, महाराष्ट्रातून आता प्रकल्प बाहेर जाणे परवडणारे नाही. कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागात प्रकल्प होऊ नये असं आजही वाटत. जमीनविक्री होत असताना स्थानिकांना संशय का येत नाही. जनतेनं जागृत राहणं गरजेचं आहे. प्रकल्प जाहीर झाल्यानंतर डोळे उघडतात. कोकणाचं हित न साधणाऱ्यांना मतदान होतं. जो राग व्यक्त करणे अपेक्षित आहे, तो व्यक्त होत नाही. जनता शांत बसते हे नेत्यांच्या पथ्यावर पडतं, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here