Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झाला. पराभूत गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जामनेरमध्ये तणावाचं वातावरण पसरले आहे. मृतदेह रुग्णालयात ठेवल्याने उपजिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.

Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

कल्याण मंडपम परिसरात दोन गटात दगडफेक

दरम्यान, परभणी तालुक्यातील वाडी दमई येथील मतमोजनी दरम्यान परभणी शहरातील कल्याण मंडपम परिसरात दोन गटात दगडफेक झाली असून यात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान हा प्रकार मतमोजणी केंद्र बाहेर घडल्याने पोलीस सांनी लगेच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवला आहे.

 परभणी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद

 परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगविले. पूर्णा तहसील परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन पांगविण्यात आले. निकाल लागल्या नंतर येथे कार्यकर्ते हुल्लडबाजी करीत होते,यावेळी दोन गटात वाद ही उफाळून येत होते,घटनेवर नियंत्रण मिळविन्यासाठी पोलिसांनी हलका लाठीचार्ज करीत कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राच्या सीमेपासून दूर पांगविले. 

Gram panchayat Election Result 2022 : Gram panchayat Election Result in Maharashtra GS

डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाखाली परळीत जास्त जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोषालाही सुरुवात केलीय. या जल्लोषात धनंजय मुंडेही सहभागी झाले आहेत. मतदारसंघात बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाल्याचा किंवा आघाडीवर असल्याचा दावा करण्यात येतोय.

सरपंच निवडणुकीत तरुणाईची क्रेझ 

मुळशी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणुकीत तरूणाईची क्रेझ पाहायला मिळाली असून मतदारांनी तरूणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिलेल्या आहेत.मतमोजणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.  मुळशी तालुक्यात सहा ग्रामपंचायतसाठी मतदान झाले.तर पौड येथील सेनापती बापट सभागृहात मतमोजणी करण्यात आली.

तहसिलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, गटविकास अधिकारी संदीप जठार, नायब तहसिलदार श्रीकांत मिसाळ हेही उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी परिसरात उमेदवार,प्रतिनिधी तसेच समर्थक यांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी नंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळन करत जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here