चिपळूण ( रत्नागिरी ) – खेड तालुक्‍यातील भेलसई येथून चिपळूणला येणारी एसटी खोल दरीच्या बाजूस घसरली. बसची बॉडी जमिनीला टेकल्याने बस खोल नदीत कोसळता-कोसळता वाचली. विद्यार्थ्यांसह सुमारे 30 ते 35 प्रवासी बसमध्ये होते. भेलसई येथील एका वळणावर सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

चिपळूण आगारातून चिपळूण शेल्डी बस सकाळी पाच वाजता सुटते. आंबडस, भेलसई, शेल्डी, गुणदेमार्गे पुन्हा भेलसईमार्गे चिपळूणला येते. नेहमीप्रमाणे ही बस चिपळूण आगारातून पाच वाजता सुटल्यानंतर आठ वाजता ती भेलसईत आली. भेलसई येथील एका वळणावर बस आली असता समोरून गुरे आडवी आल्याने चालकाने ब्रेक मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here