
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला २०२२ मधील साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रवीण बांदेकर यांचे मूळ गाव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील बांदा हे आहे. तीन समीक्षक सदस्यांच्या समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
पुरस्कार घोषित करण्याच्या प्रक्रियेनुसार, बहुसंख्येने ज्या कादंबरीला समीक्षक मत देतात त्या कादंबरीची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या कादंबरींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. १ लाख रूपये रोख, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचलंत का?