
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीतील आरेवारेच्या सागरी किनार्यापासून दोन वावाच्या आतमध्ये बेकायदेशीरपणे घुसून पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणार्या गोव्यातील दोन नौकांवर रत्नागिरीच्या सागरी सुरक्षा दलाने मंगळवारी कारवाई केली. या दोन्ही नौका पकडून त्यांना मिरकरवाडा बंदरात आणून त्या मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत या नौकांवरील कारवाई व मासळी जप्त करून तिच्या लिलावाची कारवाई सुरू होती.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी किनार्यावरून परराज्यातील नौका घुसखोरी करून मासेमारी करीत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील नौकाचालकांकडून सुरू होत्या. मंगळवारी सकाळी जिल्हा सागरी सुरक्षा पोलिस दलाचे पथक पीएसआय श्री. केदारी यांच्या नेतृत्वाखाली गस्त घालत होते. यावेळी परराज्यातील मिसीसीपी 1 व स्टार ऑफ विलीनकिनी-2 या दोनकरीत असताना आढळल्या. या पथकाने त्यांची चौकशी केल्यानंतर त्या गोवा येथील असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही नौकांवर 30 ते 35 खलाशी असल्याचे दिसून आले. पीएसआय केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष पाटेकर, पीएसआय मनोजकुमार सिंग, एसआय कैलास भांडे, एसआय पी.के. सारंग, पोलीस कॉन्स्टेबल मुख्यालय विनोद महाडिक, सुरज जाधव यांनी या सर्व खलाशांना ताब्यात घेत दोन्ही नौका भगवती बंदरात आणल्या.
या ठिकाणी नांगरून ठेवत त्या मत्स्य विभागाचे निरीक्षक पाठारे यांच्या ताब्यात देण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत या नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात येत होती. दोन्ही नौकांवरील मासळी जप्त करून तिचा लिलाव केला जाणार असल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
हेही वाचा :
After reading your article, I have some doubts about gate.io. I don’t know if you’re free? I would like to consult with you. thank you.