
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी रत्नागिरीत येणार्या पर्यटकांच्या सेवेसाठी एस. टी. विभागही सज्ज झाला आहे. पर्यटकांसाठी खास 28 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान रत्नागिरी दर्शन बसफेरी सुरू करण्यात येणार आहे. या बसमधून रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या परिसरातील अनेक पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेट देता येतील. ही गाडी दररोज सकाळी 8 वाजता रत्नागिरी बसस्थानकावरून सुटणार आहे. ही बस पर्यटकांना आडिवरे, कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे या ठिकाणांची सफर घडविणार आहे.
सायंकाळी 7 वाजता ही बस पुन्हा आरेवारे मार्गे रत्नागिरी बसस्थानकात पोहोचणार आहे. या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीटदर प्रौढांसाठी 300 रुपये आणि लहान मुलांसाठी 150 रुपये आकारण्यात येणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांची पसंती रत्नागिरीला मिळत आहे. वर्षअखेरीला पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत येतात. त्यांना वाहनांअभावी सर्वच पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. अशावेळी एसटीच्या या रत्नागिरी दर्शन फेरीमुळे पर्यटकांना एका दिवसात रत्नागिरी आणि राजापुरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी रत्नागिरी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वर्षअखेरीला पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत येतात. त्यांना वाहनांअभावी सर्वच पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. अशा वेळी एसटीच्या या रत्नागिरी दर्शन फेरीमुळे पर्यटकांना एका दिवसात रत्नागिरी आणि राजापुरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.