
पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असे वक्तव्य करून आणखी भर टाकली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार नितेश राणें यांनी जितेंद्र आव्हाडांना पत्र लिहीले आहे. “असे वक्तव्य करणे स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे,” असे राणे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेत अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
आमदार राणे यांनी पत्रात म्हटले आहे की, औरंगजेबाबाबत ”औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?“ असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
राणे यांनी या पत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. “काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे घोषित करतात. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे, असे म्हणत त्यांनी पत्रासोबत औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांच्या नावाची यादी त्यांनी दिली आहे.
हेही वाचा :