Sangli Ashta News : सांगलीच्या आष्ट्यातील शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. (Ashta Bandh Agitation)  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) त्यानंतर बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकारल्यामुळे शिवप्रेमींनी आष्टा, वाळवा बंद ठेवून आंदोलन केलं होतं.अखेर या आंदोलनाला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेच्या हस्तांतरणाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींनी जल्लोष करत बंद मागे घेतला आहे.

पुतळा हटविल्याने शिवप्रेमी आक्रमक

सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ आज आष्टा, वाळवा बंदची हाक देण्यात आली होती. आष्टा शहरात शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींनी गनिमी काव्याने बसवला होता. मात्र, पुतळा बसवण्यासाठी परवानगी नसल्याने पुतळा रात्रीच पोलिसाकडून हटवण्यात आला. यानंतर सांगलीत मोठे पडसाद उमटताना दिसून येत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यास शिवप्रेमींचा विरोध होता, तरीदेखील पोलिसांनी पुतळा आणि परिसरामध्ये 144 कलम लागू केले. तसेच रात्री लाईट बंद करुन महाराजांचा पुतळा हटवला. यामुळे शिवभक्तांनी आष्टासहित वाळवा बंदची आज हाक दिली होती. आष्टा परिसरात पूर्णता शांतता दिसून येत होती. पुतळा बसवताना पोलीस कुठे होते, याची चौकशी करुन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गनिमी काव्याने महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापणा 

आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले होते. गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचं जाहीर करण्यात आले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच 144 कलम लागू केले होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, परिसरातील संपूर्ण परिसरातील लाईट बंद करण्यात आली आणि परवानगी नसताना बसविलेला शिवरायांचा पुतळा हटविला. त्याआधी पुतळा हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये शाब्दीक चकमक उडाली.  यावेळी  रास्ता रोको करणाऱ्या शिवप्रेमींमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतले. पुतळा हटवल्याच्या विरोधात आज आष्टासह वाळवा तालुका बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची अखेर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here