चिपळूण : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर कोयना वीज प्रकल्प अंतर्गत कोयना धरण पायथा वीज गृहातील विद्युत निर्मिती बंद झाली आहे (Koyna dam). या ठिकाणी दोन वीजगृहातून ३६ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या ठिकाणी प्रत्येकी १८ मेगावॅटची दोन युनिट आहेत. संपामुळे येथील कर्मचाऱ्यांची अन्यत्र नेमणूक केल्याने हे वीजगृह बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी, पायथा वीजगृहातील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.(Koyna dam)

मात्र, कोयना वीज प्रकल्पांतर्गत उर्वरित सर्व टप्पे सुरू ठेवण्यात येणार आहेत (Koyna dam). सद्यस्थितीत कोयना वीज प्रकल्पातून ७५० ते ९५० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. टप्पा क्रमांक २, ३ व ४ मधून वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने देखील होऊ शकते. मात्र, मागणीनुसार वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विजेची कोठेही अडचण नाही. उलट ३६ मेगावॅटची युनिट बंद ठेवून तेथील कर्मचारी मोठ्या युनिटकडे वळविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्याच्या वीजपुरवठ्यावर संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here