मालवण, पुढारी वृत्तसेवा : मालवण मच्छीमार्केट किनाऱ्यावर इलेक्ट्रिक वजनकाट्यावर किरकोळ दरात मासेविक्री करण्यात येते. या मच्छीविक्रेत्या विरोधात पारंपरिक मासे विक्री करणाऱ्या महिलानी संतप्त व्यक्‍त केला. आणि विक्रेत्यांचे मासे किनाऱ्यावर ओतून टाकले.
यावेळी मच्छिमारांमध्ये आपापसात बाचाबाची होवून किनारपट्टीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

दरम्‍यान, मालवण मच्छीमार्केट नजीक समुद्रकिनारी वारंवार सूचना करून देखील इलेक्ट्रिक वजन काट्याद्वारे मासे विक्री केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी मालवण दांडी येथे पारंपरिक मच्छिमार व महिला यांची बैठक पार पडली. या बैठकीचे निमंत्रण इलेक्ट्रिक वजन काट्या विक्रेत्यांनाही देण्यात आले होते. मात्र त्यांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यामुळे आता इलेक्ट्रिक वजन काट्याने मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यापुढे मज्जाव करण्यात येईल अशी भूमिका घेण्यात आली.

शुक्रवारी आपल्याला विरोध होईल यादृष्टीने इलेक्ट्रिक वजन काटे धारकांनी मालवण मच्छिमार्केट येथे पोलीस बंदोबस्त मागविला होता. आज सकाळी 7 वाजता पोलीस बंदोबस्तात मासे विक्री करत असताना अचानक पारंपरिक मच्छिमारी विक्रेत्या महिलांनी मासे किनाऱ्यावर फेकून दिले.

याबाबत मालवण पोलिसांना माहिती  मिळाली. माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी दोन्ही मच्छिमारांच्या गटात समजोता करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु समजोता होत नसल्याने सर्वांना पोलीस ठाण्यात चर्चेसाठी नेण्यात आले.

यावेळी इलेक्ट्रिक वजनकाट्यावर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मासे विक्री करू नये अशी भूमिका पारंपारिक मत्स्यविक्रेत्या महिलांनी घेतली. तर आपल्याला किनाऱ्यावर 9 वाजेपर्यंत मासे विक्री करण्यास द्या असा पवित्रा इलेक्ट्रिक वजन काटेधारक विक्रेत्यांनी घेतला. अखेर दोन्ही गटात कोणताही समझोता न झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टीने दोन्ही गटाच्या मच्छिमारांविरोधात नोटिसा बजावल्‍या.

.हेही वाचा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

बीड : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here