खेड (रत्नागिरी ), पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी ( दि. ७) रात्री टँकरने धडक दिली. हा घातपाताचा प्रयत्न होता का, असा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज ( दि. ८) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

रामदास कदम म्हणाले, “या अपघाताची सखोल चौकशी व्‍हावी अशी मागणी मी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांची वाहने होती. तरीही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून योगेश कदम यांच्‍या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे, हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.”

उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु दापोली मतदारसंघातील जनता आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, असा संशय आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशीही मागणी रामदास कदम यांनी यावेळी केली.

या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार असल्याचे समजते, त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात वाटत आहे, असा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here