रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात असंस्कृत व असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात सामाजिक सलोखा बिघडवणे, शांतता भंग व आक्षेपार्ह विधान केल्याप्रकणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उपनेते राजन साळवी व पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे आज (दि.१७) निवेदनाद्वारे केली.

रत्नागिरी – सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात असंस्कृत व असभ्य भाषेचा वापर केला आहे. याबाबतची चित्रफीत या निवेदनासोबत पोलिसांना देण्यात आली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आमच्या नेत्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रत्नागिरी शहर व परिसरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here