
लांजा; पुढारी वृत्तसेवा : बागेत गेलेल्या गाईच्या पाठीवर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील वाघ्रट येथे घडली आहे. या प्रकरणी गाय मालक अनंत पत्याने यांनी गुरुवारी (दि.१९) रोजी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अनंत पत्याने (रा. वाघ्रट) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी म्हटले आहे की, वाघ्रट येथे राजेंद्र दिनकर साळवी यांची बाग असून या बागेतूनच आमच्या कायमस्वरूपी येणे जाण्याचा रस्ता आहे. बुधवारी (दि.१८) माझी गाय साळवी यांच्या बागेत गेली होती. त्यावेळी या ठिकाणी बागेच्या कामासाठी असलेला प्रथमेश पाथरे (रा. वाघ्रट) याने आमच्या गाईला अडवली. मी त्याला गाईला मारू नकोस असे सांगितले. मात्र त्यानंतरही प्रथमेश पाथरे याने माझ्या गाईच्या पाठीवर दुपारी ३.३० वाजता कोयत्याने वार करून तिला जखमी केले.
त्यामुळे गाईवर कोयत्याने वार करणाऱ्या प्रथमेश पाथरे याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनंत पत्याने यांनी गुरुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा;