रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम – ओखा एक्स्प्रेस 20 जानेवारीपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. याचबरोबर तिरुवअनंतपुरम सेंट्रल ते वेरावल, नागरकोईल ते गांधीधाम तसेच एर्नाकुलम ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी नियमित एक्स्प्रेस गाडी अशा चार एक्स्प्रेस गाड्या आता विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गे धावणार्‍या अनेक गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. उर्वरित गाड्याही विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून केले जात आहे. यानुसार कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी 16338/16337 एर्नाकुलम-ओखा एक्स्प्रेस अहमदाबाद दरम्यान विद्युत इंजिनसह चालवण्यास सुरुवात झाली आहे.

या गाडीबरोबरच 16334 /16 333 तिरुवअनंतपुरम सेंट्रल – वेरावल ही गाडी तिरुअनंतपुरम सेंटर येथून दि. 3 जानेवारीच्या फेरीपासून तर प्रवासात ही गाडी दि. 26 जानेवारी 2023 पासून तिरुअनंतपुरम ते अहमदाबाद दरम्यान विद्युत इंजिनसह चालवली जाईल. नागरकोईल ते गांधीधाम दरम्यान धावणारी 16336 /16335 ही एक्स्प्रेस गाडी विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. नागरकोईल येथून ही गाडी दि. 24 जानेवारीपासून तर अहदाबाद येथून ही गाडी 27 जानेवारीपासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी चौथी एक्स्प्रेस गाडी 22655/22656 एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस एर्नाकुलम येथून दि. 25 जानेवारीपासून तर दिल्ली एर्नाकुलम दरम्यान धावताना ही गाडी 27 जानेवारीपासून विजेवर चालवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here