
खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेड-आंबवली मार्गावर कुडोशी गावानजीक सोमवारी (दि.२३) दुचाकीचा अपघात होऊन सुषमा जयवंत निकम (रा.कुळवांडी, ता.खेड) या शिक्षिकेचे निधन झाले आहे. त्या मोहाने जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होत्या.
सोमवारी (दि.२३) रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसून त्या घरी परतत असताना कुडोशी गावानजीक गतिरोधकावर दुचाकी आदळली व त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले.