
रायगड; पुढारी वृत्तसेवा : रायगडचे नवे प्रभारी कलेक्टर म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती झाली आहे. रायगडच्या पंधरा तालुक्यांच्या कारभार आता म्हसे साहेब यांच्या हाती आहे. रायगड जिल्हा हा शेतीप्रधान भात शेती सह अलिबागचा सामुद्रिकिनारा, आणी औद्योगिक म्हणून तळोजा एम आय डी सी सह पाताळगंगा, रसायनी,अश्या मोठ्या कारखानदारी असणाऱ्या तालुक्यानचा समावेश आहे.शिवाय उरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुद्धा पनवेल तालुक्यात पूर्णत्वास जात आहे.सिडकोचा काही भाग सुद्धा हा पनवेल तालुक्यात येतो त्यामुळे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ योगेश म्हसे यांची कसब पणाला लागणार आहे.
त्यात उरण आणी पनवेल तालुक्यात बोगस गुंठेवारी जमीन खरेदी विक्री ला उत आला आहे.टी व्ही वर जाहिराती येत आहेत 2 लाख गुंठा मध्ये हक्काचे घर असे जाहीरातीचे भले मोठे बॅनर लावले आहेत.हे गुंठा बहादुर कोणत्या भरवश्यावर अशी जाहिरात करून लोकांची फसवणूक करून जमिनीची खरेदी विक्री चे व्हयवार करत आहेत.या पूर्वी उरणच्या माजी महिला तहसीलदार यांच्यावर अश्या प्रकारच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांची चौकशी ही चालू आहे.महसूल खात्यातील तहसीलदार यांच्या वर ही वेळ येते. खात्याला लागलेला हा डाग आता पुसली पाहिजे .आगामी काळात जिल्हा परिषदा पंचायत समिती सह स्थानिक सामाजिक संस्था निवडणूका आहेत.शिवाय पनवेल महानगरपालिका याचीही निवडणूक लागले अश्या परिस्थिती मध्ये शासकीय यंत्रणेचा खरा कस लागणार आहे.जिल्ह्याचे कार्यालय हे अलिबागला आहे.आणी महसूल ची उत्पादन बाजूही पनवेल, उरण,खालापूर,कर्जत ह्या चार तालुक्यावर आहे.अश्यात बहुगोलिक परिसर हा फार मोठा डोंगराळ आहे.यात माथेरान सारखे निसर्गरम्य ठिकाण आहे.याच्या विकासासह शिक्षण, उद्योग भरभराट,अलिबागचे पर्यटन,पनवेल मध्ये होत असणारे आंतरराष्ट्रीय विमनातळी ह्या जिल्ह्यात आहे. अश्या अनेक बाबी आहेत.त्याबरोबर आरोग्य विभाग थोडा सुस्त आहे.कर्मचारी संख्या अपुरी आहे.अपुऱ्या कर्मचारी संखे वर शासकिय गाडा हाकत आहेत.कमी कर्मचारी संखे चा बॅकलॉग भरून निघणे गरजेचे आहे.सरकारी यंत्रणेवर याचा ताण येत आहे.शिक्षकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.काहीजण आजूनही कोरोनाच्या धुंदी मध्ये आहेत.बरीच शिक्षक मंडळी राजकीय पार्टी चे झेंडे उचलत आहेत.त्याना त्यांच्या कामाचे भान राहिले नाही.पहिला शिक्षण हा पेशा होता आता धंदा झालाय.त्यालाचोराक बसने गरचेचे आहे.सर्वसामान्य जनता आता विस्कळीत झालेली घडी नव्याने बसेल डी पी डी सी ला येणारा निधी चे वाटप हे त्या भागाची परिस्तिथी पाहून झाले तर सारे चित्र झपाटयाने बदल होईल.ग्रामीम भागातील गरीब जनता अजून घरकुल च्या प्रतीक्षेत आहे.त्यांचा योग्य तो दुबार सर्व्ह होऊ एक ही गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही अशी यंत्रणा झटकून कामाला लागली तर.रायगडाचे तोरण तुमच्या हातून बांधले जाऊन नवी मुंबई विमानतळ,सी लिंक अश्या बाबी पूर्णत्वास जाणार आहेत त्या तुमच्या मार्गदर्शनाखाली च.साहेब रायगडची जनता आपल्याकडून अपेक्षा ठेऊन आहे.कलेकटकर साहेब आता रायगडचे तारणहार बनाच.
चौकट:- उरण मध्ये होत असणारी गुंठेवारी खरेदी विक्री असेल किंवा एम आय डी सी असेल त्यावर निर्माण होणारे प्रदूर्शन असेल या साऱ्या बाबींना आळा बसला पाहिजे. तर रायगडचे नंदनवंन होईल