रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरातील लोटलीकर हॉस्पिटल येथे ध्वजस्तंभ उभारत असताना स्तंभ विद्युत डीपीवर पडल्याने शॉक लागून तिघेजण जखमी झाले. ही घटना आज (दि.२५) सायंकाळी घडली. सुधीर पवार, संतोष सोलकर व मारुती शिंदे अशी जखमींची नावे आहेत.

गुरुवारी होणार्‍या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोटलीकर हॉस्पिटल आवारामध्ये ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. यावेळी ध्‍वजस्‍तंभ जवळच असलेल्या विद्युत डीपीवर पडला. सुधीर, संतोष व मारुती यांना विजेचा जोरदार झटका बसला. ते बाजूला फेकले गेले. सुधीर  गंभीर जखमी झाला असून अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here