
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मागील ९ वर्षांपासून सावर्डे येथील गुन्ह्यातील फरार आरोपीला रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गोरेगाव-मुंबई येथून ताब्यात घेतले.
किरण प्रभाकर कारेकर (५७, रा. असुर्डे खेतलेवाडी, चिपळूण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात २० जानेवारी २०१४ रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात भादंवी कलम ४९८(अ), ४९४, ४९५, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकाला तो मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सावर्डे पोलिसांकडे सोपवण्यात आले.
ही कामगिरी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर,पोलीस नाईक दत्ता कांबळे यांनी केली.
हेही वाचा