आचरा : उदय बापर्डेकर- न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून रांगोळी प्रदर्शन भरवले. सुबक रांगोळ्या साकारत यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल आचराचे स्कूल कमिटी सदस्य राजन पांगे यांचा हस्ते करण्यात आले. सुरुवातीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्थानिक स्कूल कमिटीच्या चेअरमन निलिमा  सावंत यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कुलचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी लोकल कमिटी सदस्य बाबू पाटील, इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे खजिनदार परेश सावंत, आचरा कॉलेज कमिटी सदस्य विध्यानंद परब, सदस्य दिलीप कावले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपाळ परब, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस आचरा कॉलेजचे प्राचार्य दळवी तसेच तिन्ही शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी यावेळी सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक गोपाळ परब व कला शिक्षक प्रकाश महाभोज यांचे लाभले. यावेळी न्यू इंग्लिश स्कुल व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थीनीनी देशभक्तीपर गीते सादर केली. आचरा गावचे सुपुत्र डॉ. राजेश भोसले यांनी प्रशालेतील तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांना मोफत लाडूंचे वाटप केले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here