गुहागर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील साखरी आगर कातळवाडी येथील ९ महिन्यांच्या बालकाने खेळताखेळता घरात पडलेले जेली चॉकलेट खाल्याने मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

साखरी आगर कातळवाडी येथील ९ महिन्याचे बाळ बुधवारी रोजी घरामध्ये खाली जमिनीवर खेळत होते. याचवेळी जमिनीवर पडलेले जेली चॉकलेट बाळाने तोंडात घातल्याने हे चॉकलेट त्याच्या घशामध्ये अडकले. बाळाने चॉकलेट खाल्ल्याचे जेव्हा घरच्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी बाळाला दवाखान्यात नेत असतानाच वाटेत बाळाचे निधन झाले. गुरुवारी या बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here