खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथील रेल्वे स्थानक फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी शिरगाव येथे जाणार्‍या एसटी बस चालकाला धावत्या बसमध्ये चक्कर आल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले, मात्र त्याही परिस्थितीत एसटी चालकाने ब्रेक लावत एसटी बस रस्त्याकडेला उभी केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत एसटी बसमधील 40 प्रवासी बचावले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खेड एसटी बसस्थानकातून सायंकाळी पाच वाजता सुटलेली खेड शिरगाव ही गाडी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक फाट्यावर आली असता चालक शंकर शिरसाट (38, रा. खेड) यांना अचानक चक्कर आली; त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी एसटी बसचे ब्रेक लावले. त्यामुळे बसमधून प्रवास करणारे सुमारे चाळीस प्रवासी बालंबाल बचावले. या नंतर वाहक आणि प्रवासी यांनी चालकाला भरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here