
खेड : पुढारी वृत्तसेवा : गोशाळा वाचवण्यासाठी गुरूवार ( दि. २ ) रोजी सकाळी महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत अध्यक्ष तथा श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांनी लोटे परशुराम येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत भगवान कोकरे यांनी सांगितले की, आम्ही पर्यावरण पूरक काम करत आहोत. आमच्यावर आ. भास्कर जाधव यांनी केल्या आरोपांची सखोल चौकशी करावी. दोषी आढल्यास कारवाई करावी. अन्यथा आमच्या मागण्या दि.५ पर्यंत पूर्ण कराव्यात. आम्ही निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास आमच्या गोशालेतील सर्व गाईना मुंबई -गोवा महामार्गावर सोडून आत्मक्लेश करून गोरक्षण करताना बलिदान देईन, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :