
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना 60 टक्के तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 40 टक्के मतदान मिळाले. नवी मुंबईत नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे मतमोजणी सुरू आहे.
एकूण 28 टेबलवर मतमोजणी होत आहे. महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील (शेकाप) आणि भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत होत आहे. भाजपने म्हात्रे यांच्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. पहिल्या फेरीत म्हात्रे आघाडीवर राहिले आहेत.