मालवण, पुढारी वृत्तसेवा : शेतीचे काम आटोपून रस्त्यावरून घरी परतणाऱ्या पाच महिलांना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सायंकाळी काळसे हुबळीचा माळ येथे घडला. रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय-६५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.९) सायंकाळी घडली. रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५), प्रज्ञा दीपक काळसेकर(३५), अनिता चंद्रकांत काळसेकर (वय), प्रमिला सुभाष काळसेकर (४०) असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, काळसे नगर येथील ५ महिला शेतीचे काम आटपून घरी परतत होत्या. दरम्यान, हुबळी माळ येथील मुख्य रस्त्यावर कुडाळ-नेरुरपार येथून भरधाव येणाऱ्या डंपरने मागून येत महिलांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये रुक्मिणी काळसेकर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार महिला रस्त्यालगत फेकल्या गेल्या. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झालेल्या चार महिलांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यत पुढील कार्यवाही सुरु होती.

हेही वाचंलत का?









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here