
खेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वेरळ गावातील जलालशाह बाबा दर्ग्या नजीक भर लोकवस्तीत असणाऱ्या गुरांच्या गोठ्याला शुक्रवारी दि.१० रोजी सायंकाळी ४ वाजता भीषण आग लागली. या आगीत दोन म्हशी होरपळल्या तर आजूबाजूला अनेक घरे असल्याने त्या घरांना देखील धोका निर्माण झाला.
वेरळ येथील बाळकृष्ण गोसावी यांच्या मालकीच्या गोठ्याला शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता आग लागली. आगीत गोठा व जनावरांचा चारा जाळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी गोठ्यातील ६ ते ७ जनावरे मोकळी सोडून दिली. मात्र, गोठा जळून खाक झाला तर दोन म्हैशी होरपळल्या. खेड नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न केला.
हेही वाचलंत का?