ऱाजापूर : पुढारी वृत्‍तसेवा पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे. वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. रिफायनरी हटवा. कोकण वाचवा अशा दणदणीत घोषणांनी राजापूर दणाणून गेले. पत्रकार वारिसेंच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या रिफायनरी विरोधी जनतेने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्च्याला सुरूवात झाली. मोर्चामध्ये कोकण रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम, रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुका प्रमुख रामचंद्र सरवणकर यांच्यासह उध्दव ठाकरे सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या मोर्च्यामध्ये नाणार व बारसू परीसरासह आजुबाजुच्या भागातून मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या मोर्चात रिफायनरी विरोधी घोषणा देण्यात आल्‍या. कोकणची भूमी वाचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. यासह दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप व्हायलाच हवी अशा घोषणा देण्यात आल्‍या.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here