रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणांमध्ये अधिक तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाचे स्थापना करण्यात आली आहे. या पथकाद्वारे वेगवेगळ्या शक्यता पडताळून तपास केला जाणार आहे.

राजापूर कोदवली येथे पेट्रोल पंपा मधून गाडी घेऊन बाहेर पडताना पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या गाडीला धडक देऊन रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांने अपघात केला होता ठार मारण्याच्या दृष्टीनेच त्याने अपघातानंतर गाडी फरफटका या घटनेमध्ये वारीशी यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला होता अपघाती घटनेच्या दिवशीच पळून जाणाऱ्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

त्यानंतर त्याच्यावर अपघाता बरोबरच खुनाचा गुन्हाही दाखल केला होता याप्रकरणी 14 फेब्रुवारी पर्यंत पंढरीनाथ आंबेरकर याला पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने दिले आहेत या घटनेचा तपास  डिवायएसपी यांच्याकडे सोपवण्यात आला असून आता याप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाद्वारे अपघातानंतरच्या घटनांचे व त्यापूर्वीच्या एकंदर प्रकरणाचा अभ्यास केला जाणार आहे या विशेष पथकामध्ये अभ्यासू व तपासामध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या प्रकरणात फॉरेन्सिक आणि या विषयातील तज्ञ असलेल्या व्यक्तींची ही मदत घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here