रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. त्‍याची दखल घेत उदय सामंत यांनी पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.

आज (रविवार) रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उपस्‍थित होते. यावेळी येथील पत्रकारांनी पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. या शिवाय वारिसे यांच्या मुलाला कायम स्‍वरूपी नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्‍विकारली आहे.

हेही वाचा : 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here