पनवेल; पुढारी वार्ताहर : कामोठे सेक्टर ६ मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये गॅस पाईप लाईनचे काम चालू असताना स्फोट झाला आहे. या घटनेत दोन कामगार होरपळले असून घरात असलेले इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कामोठे सेक्टर-अ मधील दुधे कॉर्नर सोसायटी मध्ये ही घटना आज (दि.१४) रात्री ८ वाजता घडली आहे. या सोसायटीमध्ये महानगर गॅस पाईप लाईनच्या कनेक्शनचे काम सुरू होते. सोसायटी मधील मधील रहिवाशी त्रिंबक जाधव यांच्या घरात हे कनेक्शन चे काम सुरू होते. या वेळी घरात पाच सदस्य आणि दोन कामगार होते. गॅस पाईपचे कनेक्शन करताना गॅसचा मेन कॉक चालू होता, गॅसचा सप्लाय देखील सुरू होता. या वेळी घरातील पाईपचा कॉक सुरु असल्याने गॅस लिकेज होत होता.

दरम्यान, गॅस कामगारांनी शोल्डारिंगचे काम सुरू केले. याच वेळी लिकेज असलेल्या पाईपने आग पकडली आणि मोठा स्फोट झाला. या आवाजाने इमारती मधील इतर रहिवाश्यांची पळापळ सुरू झाली. हा स्फोट इतका भयानक होता की, घरामध्ये इतरत्र आग लागली. यावेळी ते दोन्ही कामगार किरकोळ जखमी झाले.

आगीची घटनेबद्दलची माहिती कामोठे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्या नंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून त्वरित गॅस सप्लाय बंद केला तर पोलिसांनी तत्काळ जखमी कामगारांना कामोठे वसाहतीमधील रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले आहे.

हे वाचलंत का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here