सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक महाअधिवेशन १६ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले येथे होत आहे. या अधिवेशनास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वेंगुर्ले बंदर येथे झुलत्या पुलाच्या व तलावाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ना. शिंदे हे दुसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून यापूर्वी ते आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात आले होते.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने, टेलिफोन एक्स्चेंज ऑफिसजवळ, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी ११ वा. महाराष्ट्र राज्य त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थिती (स्थळ. टेलिफोन एक्स्चेंज ऑफिसजवळ, वेंगुर्ला), दुपारी १२ वा. मोटारीने वेंगुर्ला बंदरकडे प्रयाण. दुपारी १२.१० वा. वेंगुर्ला बंदर येथे आगमन.

दुपारी १२.१५ वा. वेंगुर्ला बंदर येथील झुलत्या पूलाचा व निशांत तलाव टप्पा- २ चा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. ( स्थळ वेंगुर्ला बंदर, जि. सिंधुदुर्ग) दुपारी १२.४५ ते १.०५ वा. राखीव. दुपारी १.०५ वा. मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी १.३५ वा. चिपी विमानतळ येथे आगमन व विमाने जळगावकडे प्रयाण.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here