
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जिल्ह्यासाठी 50 नवीन बसेस देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बसमध्ये बसून एक कि.मी. फेरफटका मारला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातंर्गत नवीन बसचे लोकार्पण शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याकरिता 50 नवीन बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.
The post रत्नागिरी : मुख्यमंत्री जेव्हा एसटीत बसतात तेव्हा..! appeared first on पुढारी.