रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथे काजू बागेत लागलेल्या वनव्यामध्ये आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५ ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वनवा विझवताना आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here