रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांच्या बंगल्याच्या बांधकामाचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून घेण्यात आले. आ. साळवी यांच्या संपत्तीची रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर झाडगाव लघुउद्योग वसाहतीतील बंगल्याचे मोजमाप घेण्यात आले. शिमगोत्सवासारख्या सणासुदीच्या दिवसातही होणार्‍या या कार्यवाहीमुळे रत्नागिरीकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या संपत्तीची रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यांची दोनवेळा चौकशी झाली असून, स्वीय सहायकांचीही चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांच्याकडील संपत्तीच्या मालकीची कागदपत्रेही मागण्यात आली. शनिवारी झाडगाव लघुउद्योग वसाहतीतील ‘साहेब’ नावाच्या बंगल्याच्या किमतीचे मूल्यमापन करण्यासाठी बंगल्याच्या बांधकामाचे मोजमाप घेण्यात आले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here