
पुढारी ऑनलाईन: काल कोकणातील खेड येथे शिवसेना ठाकरे गटाची विराट सभा झाली. सभेतील गर्दी पाहून कोकण आणि शिवसेनेचे नाते किती अतूट आहे हे स्पष्टपणे दिसून आले असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सांगितले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, खेडमध्ये काल झालेल्या सभेतून महाराष्ट्राचा कल स्पष्ट दिसत आहे. जनता किती संतप्त आहे हे कालच्या सभेतून स्पष्ट झालेच आहे. लाखो लोक ठाकरेच्या पाठिशी असून येत्या निवडणूकात देखील याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
देशातील लोकशाही धोक्यात आहे. आजही सरकारच्या विरोधात बोलले तरी, हल्ले सुरूच आहेत. मिंद्ये गटाची स्क्रिप्ट ही भाजपा लिहते. जनता भाजपच्या नावाने शिमगा करत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील जनता संतप्त आहे. जनता शिमगा करते तेवढा पुरेसे आहे, अशी मिश्किल टिकाही राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली आहे.
हेही वाचा: