विन्हेरे; विराज पाटील : महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावातील शिमगोत्सव परंपरा अबाधित ठेवणारा म्हणावा लागेल. सैनिक गाव असल्याने गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हळकूंड एकत्र आणत आगळ्या वेगळ्या पद्धतीने रचत रात्री उशिरा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होम लावतात. पहाटेच्या सुमारास होम लावण्यात येत असल्याने महाड शहारसह आसपासच्या गावातील हजारो नागरीक होम पाहण्यासाठी येत असतात.

फौजी आंबवडे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव आहे. विन्हेरे खोऱ्यात असलेल्या या गावाचे श्री काळभैरव पद्मावती हे परम आराध्य ग्रामदैवत आहे. गावात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. कैलासवाशी ह.भ.प.भाऊ भैरू पवार उर्फ भाऊ बुवा प्रतिष्ठीत विठ्ठल रखुमाईचे देऊळ हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. गावात श्री कृष्ण मंदिर, दत्तमंदिर, शिवमंदिर, राममंदिर, गणेशमंदिर, तुकाराम मंदिर, साईराम मंदिर अशी पवित्र देवस्थाने आहेत. तिथीनुसार त्यांचे उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तीभावाने साजरे होत असतात. बंधूभावाचे ऐक्य आणि शक्तीबलाचे प्रतिक असणाऱ्या ग्रामदैवताचा होलीकास्तव अर्थात शिमगा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी गावातील नागरिक लाकडू आणतात त्याची पूजा करून त्याला उभे करतात. यावेळी ग्राम दैवताला गाऱ्हाणे घातले जाते. नैवेद्य दाखविला जातो. रात्री ३ नंतर वाजत गाजत मान्यवर पंचकमिटी मंदिरापासून होम पर्यंत येत पूजा करतात. यावेळी होमची गाणी गायली जात फेरी मारत होम लावण्यात येतो. तालुक्यातील सर्वात मोठा होम म्हणून या होमकडे पाहिले जाते. याचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here