खेड ; पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका पथकाने आज (शुक्रवार) पहाटे ताब्यात घेतल्याचे समजते आहे. कदम हे ठाकरे गटातील अनिल परब यांचे निकटवर्तीय असून, नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे म्हंटले जाते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे बंधू उद्योजक सदानंद कदम यांची सक्तवसुली संचालनालय (इडी) कडून काही महिन्यांपासून चौकशी सुरू केली होती. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचं समजतं. दापोलीतील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट सोबत सदानंद कदम व ठाकरे गटातील वकील अनिल परब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरुन ही चौकशी सुरू आहे.

आज पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने उद्योजक कदम यांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दि.९ रोजी खेड येथील एका रुग्णालयात कदम यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया देखील झाल्याचे समजते. त्यानंतर लगेचच सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here