रत्नागिरी : कोकणात मळभी वातावरण निवळल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेले दोन दिवस कोकणात सोसाट्याच्या वार्‍यासह मळभी वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बदललेल्या वातावरणाने अवकाळी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बागायतदराही चिंतेत होते. मात्र, आता मलभी स्थिती दूर झाली असली तरी तापमानातील बदल कोकणातील वातावरणात दाहकता आणण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, आणि सिंधुदुरंग या पाच जिल्ह्यात किमान तापमानात वाढीची शक्यता आहे. आगामी आठवडा भर उन्हाची दाहकता वाढणार असून उष्ण लाटेची शक्यात किनारपट्टी भागात विस्तारत जाणार आहे. रत्नागिरीत गुरुवारी सकाळच्या सत्रात 31 अंश तापमानाची नोंद झाली. दुपारपर्यंत त्यामध्ये चार अंशाची भर पडली. रायगडमध्येही तापमानाचा पारा चढता राहिला असून, 37 अंश सेल्सिअस तापमानाचा चढता पारा राहिला. त्यामुळे पुढील आठवड्यात कोकणातील जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यात आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here