चौके; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि. १४) सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कुणकावळे ग्रामपंचायत नजीक झाडाला जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार. अमित शरद गावडे(वय ३९) हा जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे बसलेले त्याचे वृध्द वडील शरद राजाराम गावडे हे किरकोळ जखमी झाले.

मालवण तालुक्यातील मूळ साळकुंभा येथील रहिवासी शरद राजाराम गावडे हे महान येथे राहतात. मंगळवारी सायंकाळी शरद गावडे हे आपला मुलगा अमित याच्याबरोबर मोटरसायकलने (एम एच ०४ इ व्ही ३९९५) कट्ट्याच्या दिशेने जात होते. कुणकावळे येथील कुपेरीच्या घाटीत एका धोकादायक वळणावर त्यांची मोटरसायकल आली असता मोटरसायकलने रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्यांच्या झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार शरद गावडे हे रस्त्यावर फेकले गेल्याने ते जखमी झाले. तर मोटरसायकल स्वार अमित याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

जखमी शरद गावडे यांना कुणकावळे ग्रामस्थांनी अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहीकेने जिल्हा रुग्णालयात हलविले. मृत दुचाकीस्वाराची उशीरापर्यंत ओळख पटत नव्हती. मृत अमित आपल्या वडीलांबरोबर दुचाकीवरुन प्रवास करत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला मृत अमितचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आला. अपघाताचा तपास मालवण पोलीस ठाणेचे उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस सुनिल चव्हाण, जाँयल फर्नाडीस, देवेश प्रभू करत आहेत. दरम्यान अपघातग्रस्त आंब्याचे झाड तोडण्याची ग्रामस्थांची मागणी केली.

अनेकदा अपघात होणारे कुपेरेची घाटी कुणकावळे ग्रामपंचायत नजीकचे रस्त्यावर असलेले ते अपघातग्रस्त आंब्याचे झाड तोडण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हे झाड दुर्घटनेनंतर तोडण्याची मागणी होत आहे. कुणकावळे सरपंच मंदार वराडकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे..









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here