पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब याचे निकटवर्ती सदानंद कदम यांना पीएमएलए (PMLA) कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी कदम यांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पीएमएलए (PMLA) कोर्टाने कदम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना ‘ईडी’ने शुक्रवारी (दि.१०) अटक करण्यात आली होती.

दरम्यान, सदानंद कदम आणि याच प्रकरणात अटक करण्यात आलेले शासकीय अधिकारी जयराम देशपांडे यांची एकमेकांसमोर चौकशी करण्यासाठी ‘ईडी’ने त्यांची कोठडी मागितली होती. ही मागणी न्‍यायालयाने फेटाळली आहे. जयराम देशपांडे यांना सत्र न्यायालयाने १८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी ) कोठडी सुनावली होती. दापोलीतील साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी ‘ईडी’ पथकाने शुक्रवारी (दि.१०) पहाटे त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे भाऊ आहेत. नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here