राजापूर; पुढारी वृत्तसेवा : अवघड वळणांचा घाट म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात आज (दि. १५) एक अपघात झाला. चिरे भरुन निघालेला ट्रक खोल दरीत कोसळला. गाडीतील तांत्रिक बिघाडाबाबत संशय आल्याने चालक खाली उतरला होता त्यामुळे अपघातात तो बचावला. या अपघाताची माहिती समजताच अणुस्कुरा चेक पोस्टसह रायपाटण पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली.

राजापूर कडुन चिऱ्याने भरलेला ट्रक कोल्हापूरकडे निघालेला होता. अणुस्कुरा घाट चढत असताना ट्रकमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने गाडी थांबविली मात्र ट्रक मागे सरकत आला आणि बाजुला असलेल्या खोल दरीत कोसळला सुदैवाने ट्रक चालक खाली उतरल्याने तो बचावला त्या ट्रक मध्ये अन्य कुणी नव्हते . अपघातानंतर ट्रक मधील चिरे अस्ताव्यस्त पसरले होते अपघाताची खबर मिळताच कारवली (अणुस्कुरा )चेक पोष्ट वरील पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावुन गेले रायपाटण पोलीस दुरक्षेत्रावरील पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते .सदर ट्रकचा चालकाचे नाव गाव समजले नव्हते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here