रत्नागिरी : दीपक शिंगण : कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन गेल्या वर्षी त्याचे लोकार्पणही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेची प्रशंसादेखील केली. कोकण रेल्वेच्या याच विकृतीकरण पूर्ण केलेल्या मार्गावर विद्युत इंजिनसह गाड्यादेखील धाऊ लागल्या आहेत. मात्र, विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसेच मास्टस यावर जवळपासची माकडे उड्या मारू लागल्याने कोकण रेल्वेला त्यांना रोखण्यासाठी लाखो रुपयांची निविदा काढावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील जक ए पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणार्‍या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हरहेड (ओएचई)वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवासात खंड पडू नये व वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी कोकण रेल्वेने सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजित खर्चाची निविदा देखील काढली आहे. यामध्ये कोकण रेल्वेच्या माकडप्रिवण भागामध्ये त्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी ते राजापूर या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत.

2 COMMENTS

  1. Hello my loved one! I wish to say that this post is awesome,
    great written and come with almost all vital infos. I would like to peer more posts like this .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here