खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेडच्या जाहीर सभेसाठी भरणे नाका येथील हेलिपॅडवर सायंकाळी साडेचार वाजता आगमन झाले. नियोजनाप्रमाणे ते चार वाजता येणार होते. परंतु अर्धा तास उशिरा हेलिकॉप्टर आल्याने वेळेवर आलो ना? असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांना पाहून काढले. यावर स्वागत करताना आमदार योगेश कदम यांनी स्मितहास्य केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेलिपॅडवरून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जामगे येथे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी गेला. भरणे ते जामगे या रोडवर रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे तसेच मुख्यमंत्री आणि नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांचे स्वागताचे बॅनर सर्वत्र झळकत होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here