
बांदा; पुढारी वृत्तसेवा : ओटवणे-तारीवाडी येथील जितेंद्र तारी (34)हा युवक दाभिल नदीत बुडून मृत झाला. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस सहाय्यक निरीक्षक श्यामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांनी घटनास्थळी जात मृतदेह बाहेर काढला .
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र हा रविवार असल्यामुळे मित्रांसोबत दाभिल नदीकिनारी मासेमारीसाठी गेला होता. नदीत मोसमारी करत असताना ही दुर्घटना घडली. स्थानिकांना याची माहिती बांदा पोलिसांना दिली. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात नदीच्या डोहात जितेंद्र याचा शोध घेतला असता सुमारे
तीन फूट खोल पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान काही स्थानिकांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आणला असून सोमवारी शवविच्छेदन होणार आहे. त्यानुसार पुढील तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.