रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्री रत्नागिरीत काही भगात जोरदार पाऊस झाल्यानंतर आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात विजांच्या लखलखाटासह मळभी वातावरणात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे.

दक्षिण किनारपट्टी भागात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने आणि वाऱ्याचा प्रवाह खंडित झाल्याने त्याच्या प्रभावाने कोकणातील मुबंईसह ठाणे, रायगड रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड आदी जिल्ह्यातही पाऊस प्रभावाखाली राहणार असल्याचे हवामान खात्याने तातडीच्या संदेशात नमूद केले आहे.. या भागात विजांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here