
गावठी बॉम्बचा साठा
खेड (पुढारी वृत्तसेवा): तालुक्यातील भरणे गावाच्या परिसरात एका व्यक्तीच्या घरामध्ये गावठी बॉम्बचा मोठा साठा आढळला. हा साठा(गुरुवारी) रात्री उशिरा पलिसांकडून हस्तगत गेला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खेड तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरले जात असल्याची चर्चा सुरू होती. गुरुवारी दि.२३ रोजी सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरणे गावाच्या परिसरातून एका घरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी घरातील अडगळीच्या खोलीतून पोलिस पथकाने सुमारे ८० पेक्षा जास्त जीवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत.
या कारवाईने खळबळ उडाली असून. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी उशिरा खेड पोलिसांच्या पथकाने केली आहे. या बॉम्बचा वापर वन्य जीवांची शिकार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय असून, काही दिवसांपूर्वी खेड – पन्हाळेजे या एसटी बसच्या चाकाखाली असाच एक बॉम्ब फुटून मोठा आवाज झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासात या साठ्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्या आधारे ही कारवाई केली गेल्याचे म्हंटले जात आहे. या प्रकरणी आणखी सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा :