
सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : कणकवली तेलीआळी येथील अष्टविनायक अपार्टमेंटमधील एका बंद प्लॅटमध्ये लागलेल्या आगीत स्टेशनरी साहित्यासह अन्य साहित्य जळून खाक झाले. यामध्ये आग्निशामन पथकाच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली असून यात सुमारे ६ लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अष्टविनायक अपार्टमेंट येथील तळमजल्यावर नारायण मयेकर, शरद मयेकर, मोहन मयेकर, दत्तप्रसाद कोरगावकर या चौघांचा एक प्लॅट आहे. या चौघांनी स्टेशनरी साहित्यासह अन्य साहित्य येथे ठेवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या साहित्याला आचानक आग लागली. ही बाब निदर्शनास येताच मयेकर यांनी आग्निशामक दलाशी संपर्क साधला. घटनास्थळी धाव घेत आग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र या आगीत ६ लाखाचे नुकसान झाले. आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचलंत का ?