बांदा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा सीमेवरील बांदा सटमटवाडी येथील सिंधुदुर्ग आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका शनिवार १ एप्रिल पासून सुरु होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने टोलनाक्यात जय्यत तयारी सुरु आहे. याबाबत प्रशासनाकडून सर्व अधिकृत परवाने प्राप्त झाले आहेत मात्र याबाबत पत्रकारांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही .

बांदा – सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका साकारला आहे. स्थानिक शेतकर्‍यांशी संघर्ष करुन महसूल प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी चुकीचे अहवाल सादर करण्यात आले होते. बर्‍याच शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही.

सदर सीमा तपासणी नाक्यावर खासगी वाहनांची स्कॅन करुन तपासणी होणार आहे. तसेच व्यावसायिक वाहतुकीवर साडेसात मेट्रिक टन वजनाच्या वाहनासाठी ४७ रुपये २० पैसे,  मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे टोल आकारला जाईल.

जड व अतिजड व्यावसायिक वाहन  वजन १२ मेट्रिक टनच्या पुढे  असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. कृषी मालाची वाहतूक तसेच संरक्षण विभागाच्या वाहनांना सवलत मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा :









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here