रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी सन – २०२१ मध्ये लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा 2 एप्रिल रोजी सकाळी ०८.३० वाजता रत्नागिरी शहरातील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे.

या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी https://policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास दिनांक २९ मार्च २०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
लेखी परीक्षेकरीता, प्रवेशपत्र निर्गमित केलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या प्रतिसह 2 एप्रिल रोजी सकाळी ठीक ६ वा. उपस्थित राहावे.

लेखी परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे www.ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना काही अडचण किंवा समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष रत्नागिरी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here